पाडळी बुद्रुक

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

Slide 1

- सन २०२४/२५ - श्री भैरवनाथ मंदिर

' क ' वर्ग दर्जा प्राप्त

गावातील श्री भैरवनाथ मंदिराला "क" वर्ग दर्जा प्राप्त झाला.

Slide 1

- सन २०२४/२५ - रस्त्यांची कामे

नवीन रस्त्याचे उद्घाटन

गावातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निधीतून रस्त्यांची कामे केलीत

Slide 1

- सन २०२४/२५ - इमारत

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक इमारत

ग्रामपंचायत इमारतीमध्ये राजर्षी शाहु सभागृह ची स्थापना केली

माझं गांव माझं मंदिर

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘पाडळी बुद्रुक’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक, पहिली कार्यकारिणी

पाडळी बुद्रुक

राजकीय

राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.

पाडळी बुद्रुक

सहकार

सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.

पाडळी बुद्रुक

क्रिडाक्षेत्र

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

विविध विकासकामे

सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं
नावाजले जाते.

श्री.शिवाजी दत्तात्रय गायकवाड यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. ग्रामपंचायत इमारत, श्री भैरवनाथ मंदिराला “क” वर्ग दर्जा मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

गावाची भौगोलिक स्थिती

सन २०११ च्या जनगणनेनुसार

एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या
पुरुष संख्या
स्त्री संख्या
00 Shivaji Gaykwad HD
लोकनियुक्त सरपंच

श्री.शिवाजी दत्तात्रय गायकवाड

बी. ई. सिव्हिल

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

श्री.शिवाजी दत्तात्रय गायकवाड आपल्या वडीलाप्रमाने राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली पाडळी बुद्रुक गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, निर्व्यसनी, सुशिक्षित असे एक युवा नेतृत्व लाभले.

त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, हनुमान मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://gppadalibu.best-option.in” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

श्री.धनाजी शंकर पाटील

उपसरपंच (प्रभाग क्रमांक 2)

सौ.अरुणा अशोक पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

श्री.गौतम शामराव सरनाईक

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

श्री.दत्तात्रय पिराजी पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

सौ.सिद्धी सचिन पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

श्री सुनिल पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

सौ.तेजस्विनी स्वप्नील पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

सौ.चंद्रभागा भैरवनाथ दुधाणे

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

सौ.शीतल स्वप्नील पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

श्री.अवधूत पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.राहुल महादेव कळके

महसूल सेवक – पाडळी बुद्रुक

श्री बाजीराव पांडुरंग मेंगाणे

पोलिस पाटील – पाडळी बुद्रुक

ग्रामपंचायत पाडळी बुद्रुक

गावातील चालू घडामोडी

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ

विद्या मंदिर पाडळी बुद्रुक येथे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ पालक, शिक्षकवृंद, शालेय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

त्यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, पुस्तके आणि खाऊ देण्यात आला.